पुणे – मुंबईच्या दादरमध्ये जन्म आणि पुण्यात वास्तव्य झालेल्या हेमंत थाटे या हृदय रोगतज्ञ डॉक्टरांनी अवयव प्रत्यारोपण क्षेत्रात क्रांती घडविली आहे. हेमंत सध्या हॉर्वर्ड विद्यापीठात वरीष्ठ हृदयरोज तज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

हेमंत यांनी २१ विविध प्रकारची रसायने एकत्र करून सोम नावाचे मिश्रण तयार केले आहे. यामुळे अवयव काढल्यानंतर किमान सात दिवस ते उत्तम स्थितीत राखणे शक्य झाले आहे. सोम हा संस्कृत शब्द असून त्याचा उल्लेख वेदकाळातही आला आहे. सोमरस प्यायल्याने रोगमुक्ती मिळते तसेच अमरत्व मिळते असे भारतीय वेदांत सांगितले गेले आहे. हेमंत यांनी तयार केलेला सोम सामान्य तापमानातही काम करतो.हे मिश्रण पूर्ण क्षमतेने वापरात येण्यासाठी आणखी कांही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मृत अथवा जिवंत व्यक्तीने अवयव दान केले असेल तर हृदय किवा फुफ्फुसे चार ते सहा तासात, लिव्हर आठ तासात, किडनी चोवीस तासात वापरल्या गेल्या तरच त्यांचा कांही उपयोग होऊ शकतो अन्यथा प्रत्यारोपण यशस्वी होत नाही. हेमंत यांनी शोधलेल्या मिश्रणामुळे हे अवयव ७ दिवसांपर्यंत चांगल्या स्थितीत राहू शकतात त्यामुळे प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसाठी पुरेसा अवधी मिळू शकतो.
हेमंत यांनी १० वर्षांपूर्वी गाला नावाचे असेच रसायन शोधून काढले आहे. त्याच्या वापराने हृदय शस्त्रक्रियेच्यावेळी रक्तवाहिन्या सुरक्षित ठेवण्याचे काम केले जाते. हे मिश्रण अमेरिका आणि फ्रान्समध्ये वापरले जात आहे.