
मुंबई – संजय दत्तला जो न्याय लावला जातो तसाच साध्वी प्रज्ञासिंग आणि कर्नल पुरोहित यांना का लावला जात नाही असा सवाल शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला आहे. संजय दत्तला वारंवार मंजूर केल्या जात असलेल्या पॅरोलवर टीका करताना ठाकरे म्हणाले की, मालेगांव बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञासिंग आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावर अद्यापी गुन्हा सिद्ध झालेला नाही. तरीही गेली पाच वर्षे त्यांना तुरूंगवास भोगावा लागतो आहे.
