इंटरनेट युजरना अकौंट हॅकिगची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे आणि सर्व जगभरातील युजर हॅक न करता येणारा पासवर्ड मिळावा यासाठी प्रयत्नशीलही असतात. त्यावर यूएईच्या झेडएसएस संशोधन संस्थेतील झियाद उल सलूम यांनी तोडगा काढला आहे. त्यांनी यासाठी अतिशय साधी पण व्यवहार्य अशी पद्धत शोधून काढली आहे. याहू, द्विटर, यूएस सरकार, लिकडेन, गुगल, सोनी, एव्हरनेट व अन्य इंटरनेट कंपन्यांनीही पासवर्ड साठीचे प्रोग्रॅम बनविताना कुठे ना कुठे कॉम्प्रमाईज केलेच आहे व त्यामुळेच तेथील पासवर्ड कधीच अभेद्य होऊ शकत नाहीत असेही त्यांचे म्हणणे आहे.
युजर पासवर्ड हॅक होऊ नये म्हणून अतिशय गुंतागुंतीचे किचकट पासवर्ड घेतात पण ते लक्षात ठेवणे बरेच वेळा अडचणीचे होते. मात्र आपण आपल्या आयुष्यात पाहिलेले किवा भेट दिलेले कोणतेही ठिकाण, त्याच्या सीमारेषा, अक्षांश, रेखांश, संबंधित परिसराचे आकारमान असा पासवर्ड निवडायचा. याला म्हणतात जिऑलॉजिकल पासवर्ड. इतकचे करून थांबायचे नाही तर या पासवर्डला सॉल्टेड स्टींग घालायची. म्हणजे पासवर्ड सॉल्टेड करायचा. आता असा पासवर्ड हॅक करणे हॅकरना अशक्य बनते असे सलून यांचे म्हणणे आहे.
समजा दोघांनी असे लोकेशन निवडताना एकच पासवर्ड न कळत घेतला तरी कांहीही अडचण येत नाही कारण प्रत्यक्ष दिसणार्या पासवर्डपेक्षा त्यामागे असलेले सेटींग युनिकच राहते असाही सलून यांचा दावा आहे. हे संशोधन सिक्युरिटी अॅन्ड नेटवर्क जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.