एनएसए हेरगिरी – ओबामा प्रशासनाविरोधात दावा दाखल

वॉशिंग्टन – एडवर्ड स्नोडेनने उघडकीस आणलेल्या अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेकडून केल्या गेलेल्या हेरगिरी प्रकरणी अमेरिकी खासदारानी ओबामा प्रशासनाविरोधात अधिकृतपणे दावा दाखल केला असल्याचे समजते. केंटुकीचे रिपब्लीकन पक्षाचे खासदार रँड पॉल यांनी हा दावा न्यायालयात दाखल केला असून हा दावा सुप्रीम कोर्टात जाईल असा विश्वासही व्यकत केला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा, राष्ट्रीय गुप्तचर विभागाचे प्रमुख जेम्स क्लॅपर, एनएसएचे प्रमुख कीथ अलेंक्झांडर यांना या दाव्यात आरोपी केले गेले आहे. कोणतेही स्पष्टीकरण न देता, न्यायालयाचे वॉरंट नसताना आणि कोणतीही संशयास्पद कृती न करताही ज्या नागरिकांचे फोन टॅप करून त्यांची माहिती ज्या प्रकारे मिळविली गेली त्यामुळे संबंधितात प्रचंड संताप उसळला असल्याचे दावेदारांचे म्हणणे आहे. या हेरगिरीतून दहशतवादास आळा बसल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही म्हणून हा दावा दाखल केला असल्याचे सांगितले गेले आहे. व्हर्जिनियाचे माजी अॅटर्नी जनरल केन ककिनेनी या दाव्यात वकील म्हणून काम पाहणार आहेत.