पॉडिचेरी- छोटेसे पण सुंदर संघराज्य

पॉडिचेरी अथवा पुदुचेरी हा भारताचा केंद्रशासित प्रदेश म्हणजे छोटेसे पण अती सुंदर असे संघराज्य आहे. स्वातंत्र्यापूर्वी दीर्घकाळ फ्रेंचांच्या ताब्यात असलेल्या या प्रदेशावर आजही फ्रेंच साम्राज्याच्या अनेक खुणा दिसतात. फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि ब्रिटीन या देशांशी या प्रदेशाचे नाते जोडले गेले होते ते येथे या देशांनी केलेल्या व्यापारी वसाहतींमुळे. बाकी देशांचा पगडा या प्रदेशावर आता राहिला नसला तरी आजही फ्रेंच शिल्पकला, खाद्यपदार्थ आणि संस्कृती यांच्या खुणा जागोजागी पाहायला मिळतात.

अतिशय शांत असलेले हे शहर १६७० साली फ्रेंचानी ताब्यात घेतले ते भारताला १९५४ साली परत मिळाले. स्वच्छ सुंदर रस्ते, असलेले  हे शहर फ्रेंच ग्रिड पॅटर्नवर उभारले गेले असून दोन भागात त्याची विभागणी झाली आहे. फे्रंच क्वार्टर आणि तमीळ क्वार्टर अशी ही विभागणी आहे. महान योगगुरू अरविंद झोष यांचा आश्रम हे या शहराचे आणखी मोठे आकर्षण. १९२६ साली स्थापन झालेल्या या आश्रमात योग आणि अध्यात्माच्या अभ्यासासाठी अनेक विदेशी सतत येत असतात. अरविदाची शिकवण समजून घेत असतात. आश्रमाची सुंदर, शांत जागा थकल्या भागलेल्या आणि निरनिराळ्या विचारांनी गांजलेल्यांना मनःशांती देत असते.

येथून १२ किमी वर असलेल्रे ओरोविल गाव हे जागतिक बंधुभावाचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. अनेक देशांचे नागरिक येथे गुण्यागोविदाने आयुष्य जगतात. पॅराडाईज सेरेनिटी, प्रोमेनाडस, आरोविल बीच, वॉर मेमोरियल, डुप्लेक्स स्टॅच्यू, रोमन रोलँड लायब्ररी ही येथील कांही प्रेक्षणीय स्थळे आवर्जून पाहावीत अशी. येथील मंदिरांनाही भेट द्यायलाच हवी कारण मनाची शांतता तुम्हाला येथे नक्कीच गवसते.

चेन्नईपासून विमान, बस, टॅक्सी इत्यादी वाहनांनी पॉडिचेरीला जाता येते.