
मेलबर्न- व्हिसा गैरव्यवहारप्रकरणी भारतीय वंशाच्या जोडप्याला ऑस्ट्रेलियातील पोलिसांनी अटक केली आहे. परदेशातील ग्राहकांना ऑस्ट्रेलियातील महिलेशी खोटे लग्न लावून व्हिसा मिळवून देण्याचे काम ते करत असत. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये हा गैरप्रकार उघड झाल्यानंतर त्यांना आज (गुरुवार) अटक करण्यात आली. मूळचा मुंबईचा असणारा चेतन मोहनलाल मश्रू आणि त्याची पत्नी दिव्या कृष्णेगौडा यांना ब्रिस्बेनमधील त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणी ते दोषी आढळल्यास त्यांना दहा वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि सुमारे दीड लाख डॉलर प्रत्येकी दंड होऊ शकतो.
