स्राएल हा पाण्याचे कायमस्वरूपी दुर्भिक्ष असलेला देश आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी तिथल्या एका कंपनीने मोठे वॉटर जनरेटर आणि छोटी यंत्र विकसित केली आहेत. हवेतून शोषलेले बाष्प वापरून त्यापासून या यंत्राने पिण्याचे शुद्ध पाणी तयार केले जाते.
आता हवेमधून मिळणार पिण्याचे पाणी
वॉटरजेन या कंपनीने विकसित केलेले वॉटर जनरेटर मोठ्या औद्योगिक किंवा निवासी संकुलात वापरले जातात तर छोटी यंत्र कारमध्ये अथवा लहान कार्यालयात, दुकानात वापरले जातात. ही यंत्रणा आता भारतात देखील उपलब्ध झाली असून त्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्यासाठी हवेमध्ये २० टक्के आर्द्रता असणे आवश्यक आहे. वॉटर जनरेटर २४ तासात ८०० ते ९०० लिटर पाणी तयार करू शकतो तर छोट्या यंत्रातून २४ तासात ३० लिटर पाणी तयार होते. या पाण्याचा उत्पादन खर्च साधारणपणे ५० ते ६० पैसे प्रति लिटर एवढा आहे.
हवेपासून पाणी तयार करणारे छोटे यंत्र कारच्या डिकीत बसवण्यात येते तर पाण्याचा नळ गिअर बॉक्सजवळ बसविण्यात येतो. त्यामुळे कारमधील प्रवाशांना शुद्ध पाण्याचा सतत पुरवठा केला जातो. आता वॉटरजेन कंपनी विविध कार उत्पादक कंपन्यांना संपर्क करत असून या गाड्यांमध्ये पाण्याची यंत्रणा बसविण्याचा कंपनीचा मानस आहे.
वॉटर जनरेटर इमारतीच्या गच्चीवर बसवून नळाद्वारे इमारतीमध्ये पाणी पुरवठा केला जातो. भारतील जयापुरिया ग्रुप या कंपनीशी वॉटरजेन कंपनीने सहकार्य करणार केला असून भारतात या ग्रुपकडून ही यंत्रणा पुरवली जात आहे.
