
मुंबई- राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिका-यांनी १३ फेब्रुवारीला पुकारलेला बेमुदत संप मागे घेतला आहे. हा संप मागे घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारी कर्मचारी संघटनांना केले होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी संघटनेच्या पदाधिका-यांसोबत चर्चा केली. कर्मचा-यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार नक्की केला जाईल, असे आश्वासन सरकारने दिले.
