मुंबई : जुलै २0११मध्ये दादर, झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊस येथे बॉम्बस्फोट घडविण्याआधी आयएमच्या अतिरेक्यांनी वानखेडे स्टेडियमची पाहणी केली होती. तेव्हा आयपीएलचा हंगाम सुरू होता. स्टेडियममधील गर्दी, सामना पाहण्यासाठी आलेले परदेशी पर्यटक, मुंबई पोलिसांची सुरक्षा व्यवस्था भेदून बॉम्ब स्फो१ट घडवून आणण्याचा आयएमचा भारतातील प्रमुख यासीन भटकळ आणि त्याचा साथीदार असादुल्ला अख्तर ऊर्फ तबरेझ याच्या चौकशीतून हा हेतू स्पष्ट झाल्याचे समजते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नाचक्की करायची, असे ठरवूनच इंडियन मुजाहिदीनचे (आयएम) अतिरेकी २0११मध्ये मुंबईत दाखल झाले होते. आयएमचा भारतातील प्रमुख यासीन भटकळ आणि त्याचा साथीदार असादुल्ला अख्तर ऊर्फ तबरेझ यांच्या चौकशीत जुलै २0११मध्ये दादर, झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊस येथे बॉम्बस्फोट घडविण्याआधी आयएमच्या अतिरेक्यांनी वानखेडे स्टेडियमची पाहणी केली होती. तेव्हा आयपीएलचा हंगाम सुरू होता. स्टेडियममधील गर्दी, सामना पाहण्यासाठी आलेले परदेशी पर्यटक, मुंबई पोलिसांची सुरक्षा व्यवस्था भेदून बॉम्ब आत न्यायचाच झाला तर कसा न्यायचा आणि कुठे पेरायचा याची पाहणी करण्यासाठी अतिरेकी वकासने केली होती.
त्यासाठी तो २0 एप्रिलला वानखेडेवर रंगलेला मुंबई इंडियन्स विरुद्ध पुणे वॉरिअर्स हा सामना पाहिला. तिकीट काढून तो स्टेडियममध्ये दाखल झाला. प्रेक्षकांमध्ये सर्वसामान्याप्रमाणे बसला आणि त्याने सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास केला. मात्र स्टेडियमबाहेर आणि आत पोलीस, खासगी सुरक्षारक्षकांचा बंदोबस्त पाहून तो घाबरला. वानखेडे स्टेडियमच्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती यासीनकरवी रियाझ भटकळपर्यंत पोहोचवली आणि स्टेडियमच्या आत बॉम्ब नेणे निव्वळ अशक्य असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यामुळे स्टेडियममध्ये बॉम्बास्फोट घडविण्याचा विचार त्यांनी बदलला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.