वर्देची टी-५ मोटरसायकल सादर

दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या ऑटो एक्स्पो मध्ये वर्देंची टी ५ ही मोटरसायकल सादर केली गेली आहे. भारतात सादर होणारी ही पहिली अल्ट्रा प्रिमियम बाईक आहे. नव्या मुंबईतील वर्देचीं प्रकल्पात या गाडीचे डिझाईन केले गेले आहे मात्र तिचे इंजिन इटालीच्या मोटोमोरितनी कंपनीतून मागविले जाते असेही समजते. या गाडीची किमत आहे १२ लाख रूपये.

या गाडीचे इंजिन १८०० सीसीचे असून ही क्षमता तीन नॅनो कारच्या इंजिनांइतकी आहे. युरोपमध्ये मोटोमोरिनी कंपनीच्या नेटवर्कच्या माध्यमातून या गाडीची विक्री केली जात आहे. या गाडीची संकल्पना आणि संशोधन बॉलीवूड अभिनेत्री समीरा रेड्डी हिचे पती अक्षय वर्दे यांनी केले आहे.