
टोकियो – जपानमध्ये मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टी सुरू आहे. राजधानी टोकियोमध्ये दोन फुटांपर्यंत बर्फाचे थर जमले आहेत. जपानला शनिवारी बर्फवृष्टीचा तडाखा बसला. त्यात दोन महिलांचा मृत्यू तर 90 नागरिक जखमी झाले. यातील 17 जणांची प्रकृती गंभीर आहे. राजधानी टोकियोमध्ये दुपारपर्यंत 12 सेंटिमीटर एवढी बर्फवृष्टी झाली. रात्रीपर्यंत बर्फाचे प्रमाण 20 सेंटिमीटरपर्यंत पोहोचू शकते, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
