लोणावळा- गेल्या काही दिवसांपासून महिलावरील अत्याचाराच्यात प्रमाणात वाढ होत आहे.
गेल्या पाच वर्षांपासून अश्लिल व्हिडिओ शुटिंग करून ते सगळीकडे दाखविण्याची भिती दाखवून लोणावळ्यातील एका विवाहितेवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी संजय शंकर खरपासे ( वय ३८, रा. लोणावळा ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संजय खरपासेला अद्यापही अटक केलेली नाही. आरोपी संजय याने पीडित विवाहितेला तिच्यावर केलेले अश्लिल व्हिडीओ शूटिंग सर्वांना दाखविण्याचा धाक दाखविला.
लोणावळ्यातील विवाहितेवर वारंवार बलात्कार करण्यावस तिने विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. हा प्रकार गेले पाच वर्षे सुरू असल्याची माहिती सदर विवाहितेने दिली. या प्रकरणी लोणवळा पोलिस ठाण्याात गुन्हा नेांद झाला असून याप्रकरणचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.