
‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. टीझर रिलीज झाल्यापासून चित्रपट निर्मात्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे, नंतर ट्रोलिंग आणि आता चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका. ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. चित्रपटात भगवान राम आणि हनुमान यांचे चुकीच्या पद्धतीने चित्रण करण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
प्रभू राम आणि हनुमानाचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप करत ‘आदिपुरुष’ चित्रपटाविरोधात याचिका दाखल
उत्तर प्रदेशात तक्रार दाखल
दिल्लीत याचिका दाखल करण्यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये प्रभास, सैफ अली खान, क्रिती सेनॉन स्टारर ‘आदिपुरुष’ विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. लखनऊमधील एका वकिलाने चित्रपटातील कलाकार आणि निर्मात्यांविरोधात कारवाईची मागणी करत कोर्टात धाव घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार, लखनौचे वकील प्रमोद पांडे यांनी गुरुवारी मुख्य न्यायदंडाधिकारी (सीजेएम) यांच्याकडे तक्रार दाखल केली होती, ज्यात सैफ अली खान, प्रभास, कृती सेनॉन, निर्माता-दिग्दर्शक ओम राऊत आणि भूषण कुमार यांना पक्षकार बनवले होते. हिंदू देवतांची, विशेषत: हनुमान आणि राम यांची पात्रे चुकीच्या पद्धतीने चित्रित केल्याबद्दल सेलिब्रेटी आणि चित्रपट निर्मात्यांविरुद्ध CrPC च्या कलम 153(3) अंतर्गत फौजदारी खटले नोंदवले जावेत, असे ते म्हणाले.
2020 मध्येही सैफ अली खानवर दाखल करण्यात आला होता गुन्हा
दोन वर्षांपूर्वीही सैफ अली खानच्या एका वक्तव्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिवाणी न्यायालयाचे वकील हिमांशू श्रीवास्तव यांनी उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी (ACJM) यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर सैफ अली खानने माफी मागितली आणि त्याचे वक्तव्यही मागे घेतले.
काय म्हणाला होता सैफ?
हिमांशू म्हणाले की, भगवान राम हे चांगल्याचे तर रावणाला वाईटाचे प्रतीक मानले जाते. या अनुषंगाने दरवर्षी विजयादशमी हा सण साजरा केला जातो. ‘आदिपुरुष’ नावाचा हा चित्रपट प्रभू रामावर बनवला जात आहे, ज्यामध्ये अभिनेता सैफ अली खान रावणाची भूमिका साकारत आहे. याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, 6 डिसेंबर 2020 रोजी सैफ अली खानने एका मीडिया मुलाखतीत सांगितले होते की, लक्ष्मणाने रावणाची बहीण शुर्पणखा हिचे नाक कापले होते, त्यामुळे रावणाने सीतेचे अपहरण केले, हे समर्थनीय आहे, असेही या मुलाखतीत म्हटले आहे की. या चित्रपटात रावणाची परोपकारी आणि मानवी बाजू मांडली जाईल.
