अहमदनगर – आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणूकीमुळे राज्यानतील वातावरण राजकारणमुळे ढवळून निघाले आहे. मुंबईत मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीची बैठक पार पडली. त्यामध्ये मतदारसंघनिहाय जबाबदारी निश्चित करण्यात आली असून नगरची जबाबदारी पालकमंत्री मधुकर पिचड आणि आमदार बबनराव पाचपुते यांच्यावर सोपविण्यात आली. त्याममुळे आता अहमदनगर जिल्ह़ायातील गटातटाच्या राजकारणाला आणखीन वेग येणार आहे.
आगामी काळात होत असलेली लोकसभा निवडणूक पाहता, राष्ट्रवादीच्या गोटात उमेदवारीवरुन प्रचंड राजकारण रंगले आहे. रोज नवे समिकरण जन्म घेत आहेत. पक्षाकडून आमदार बबनराव पाचपुते आणि माजी आमदार राजीव राजळे यांच्यातील चुरस टोकाला पोहचलेली दिसते. अन्य नावेही उमेदवारीसाठी घेतली जात आहेत. पक्षांतर्गत विविध मतप्रवाह आपला तर्क रेटून नेत आहेत. कार्यकर्त्यांचे मेळावे घेवून राजळेंनी स्पष्ट संकेत देण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर उमेदवारीवर जाहीर दावा ठोकला. याबरोबर विरोधी गटही सक्रीय झाला. शुक्रवारी मुंबईत होणा-या बैठकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष होते.
या बैठकीत प्रदेशाध्यक्ष आमदार भास्कर जाधव यांनी राज्यातील २२ मतदारसंघनिहाय पक्षीय जबाबदार्याप निश्चित केल्या. १ ते १0 फेब्रुवारीदरम्यान हे नेते मतदारसंघाचे दौरे करुन तयारीचा आढावा घेतील. नगर दक्षिणची जबाबदारी पिचड आणि पाचपुतेंवर सोपविण्यात आली आहे. आढावा घेण्यासाठी जाहीर झालेल्या जबाबदा-या महत्वपूर्ण मानल्या जात आहेत. याचे अर्थ सोयीनेही लावले जात आहेत. पाचपुतेंवर मतदारसंघाची जबाबदारी सोपविले म्हणजे ते उमेदवारीच्या शर्यतीतून बाद झाले, असा अर्थ राजळे सर्मथकांनी काढला. त्यामुळे पाथर्डीत फटाके फोडून आनंदही साजरा झाला.