मुंबई- सर्वांचे लक्ष लागलेल्या मुंबईतील मोनोरेलचे उद्घाटन एक फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार असून दोन फेब्रुवारीपासून मोनो रेल धावायला सुरुवात होणार आहे. वडाळा ते चेंबूरपर्यंत मोनोरेलचा हा पहिला टप्पा असणार आहे.

मोनोरेल वडाळा ते चेंबूर या मार्गावर ८.८ किलोमीटर अंतर धावणार आहे. या प्रवासात सात स्थानके असतील. मुंबईत धावणारी ही मोनो रेल देशातली पहिली मोनोरेल ठरणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) या संस्थेच्या अधिका-यांनी या अभुतपूर्व ऐतिहासिक क्षणाची सारी तयारी केलेली आहे.
मोनो रेलचे उद्घाटन होणार असले तरी ती सुरुवातीचे काही दिवस दर नऊ मिनिटाला एक गाडी या वेगाने दिवसा फक्त पाच तास चालवली जाणार आहे. एकदा हा प्रयोग यशस्वी झाला की, नंतर दोन गाड्यातले अंतर चार मिनिटे करून एकंदर वाहतुकीचा वेळसुद्धा पाच तासांवरून वाढवत नेला जाणार आहे.