
पुणे ता २ ९ : मंदी असतानाही महाराष्ट्रातील सॉफ्टवेअर क्षेत्राने भरीव कामगिरी केली असून गेल्या वर्षी ५ १ हजार कोटी रुपयांची निर्यात केली आहे. यात एकट्या पुणे विभागाचा हिस्सा २ ९ हजार कोटी रुपये आहे. आगामी २ ० २ ० सालापर्यंत देशाची एकूण निर्यात ७ ० ० अब्ज डॉलर होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या कामगिरीची माहिती देताना सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडियाचे महासंचालक ओंकार राय पत्रकार परिषदेत म्हणाले की माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला दिलेली प्राप्तिकर सवलत २ ० १ १ मध्ये संपल्यानंतर सॉफ्टवेअर क्षेत्राने कामगिरी केलेली असल्याने निश्चित कौतुकास्पद आहे. गेल्या वर्षी झालेली एकूण निर्यात दोन लाख ५ १ हजार कोटी रुपयांची आहे . मंदी असताना ७ . २ टक्के वाढ झाली आहे. महाराष्ट्र आणि पुण्याचा त्यातील वाटा मोठा आहे मात्र या व्यावसायिकांच्या मागण्या आणि अडचणी लक्षात घेऊन एकच नियामक यंत्रणा असणे गरजेचे आहे.
