दहावीच्या परीक्षांवरही कर्मचा-यांच्या बहिष्कांराचे सावट

मुंबई- परीक्षांच्या तोंडावर उच्च माध्यमिक शिक्षकांनी दिलेल्या बहिष्काराच्या इशा-यामुळे बारावीच्या परीक्षांवर बहिष्काराचे सावट आहे. त्याितच आता राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचा-यांनी आपल्या मागण्यांसाठी आता १३ फेब्रुवारीपासून राज्यातील शाळा बेमुदत बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षांवरही सावट आहे.

राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतरांच्या विविध सहासंघटनांनी सोमवारी शिक्षक संचालनालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनात राज्यातील दीड ते दोन हजार शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

आगामी काळात राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतरांच्या विविध मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यातील सर्व शाळा १३ फेब्रुवारीपासून बेमुदत बंद करण्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे. त्यामुळे बारावीपाठोपाठ दहावीच्या परीक्षांवरही अडचणींचे सावट आहे. त्यादमुळे परीक्षेपूर्वी हे आंदोलन मिटणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.