लंडन – लंडनची राणी क्वीन एलिझाबेथ दुसरी यांच्या खजिन्यात शेवटचे १० लाख पौंड म्हणजे १०.३५ कोटी रूपये शिल्लक असल्याचे हाऊस ऑफ कॉमन्सच्या पब्लीक अकौंट कमिटीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ब्रिटनच्या इतिहासात राणीचा इतका कमी खजिना असण्याची ही पहिलीच वेळ आहे. रॉयल हाऊसकडून करण्यात येत असलेल्या भरमसाठ खर्चामुळे ही पाळी ओढवली असल्याचेही सांगितले जात आहे.
राजघराण्याकडून गेल्या पाच वर्षात फक्त पाच टक्के बचत केली गेली आहे. राजवाडा पडायला आला असून त्याची दुरूस्ती करणे आवश्यक आहे मात्र खजिन्यात आता त्यासाठी पैसाच शिल्लक नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ब्रिटीश सांसदानी या परिस्थितीसाठी रॉयल आर्थिक सल्लागार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. या सल्लागारांनी राणीच्या खर्चाचे योग्य नियोजन न केल्याने ही वेळ आल्याचे लेबर पक्षाच्या खासदार मार्गारेट होज यांचे म्हणणे आहे. यापुढे तरी राजघराण्याने आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवणे गरचेचे असल्याचे त्यांचे मत आहे.
ब्रिटन सध्या आर्थिक संकटातून मार्ग काढत आहे त्यामुळे परदेशी दौरे व अन्य दौर्याच्यावेळी होणार्या खर्चात रॉयल फॅमिलीने तसेच त्यांच्या दरबार्यांकनी काटकसर केलीच पाहिजे असाही आग्रह या सांसदांनी केला आहे. २००१ साली राणीच्या खजिन्यात ३६३.२ कोटी रूपये शिल्लक होते.