टोलविरोधात राज ठाकरे आक्रमक

पुणे – राज्यातील टोल विरोधात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा आक्रमक झाले असून कुणींही टोल देऊ नये असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. पुण्यात मनसेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन करताना ते बोलत हते. त्यांच्या या आवाहनाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्वरीत प्रतिसाद दिला असून टोल मागणार्‍या ऐरोली आणि मुलुंड टोल नाक्याची तोडफोड करण्यात आली आहे.परिणामी टोल विरोधातील आंदोलन पुन्हा भडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना आजित पवारांनी दादागिरी करू नये असा इशाराही दिला. ते म्हणाले टोलविरोधात सर्वप्रथम मनसेने आंदोलन सुरू केले व त्याची दखल घेऊन ६५ ठिकाणचा टोल रद्द केला गेला. रस्ता पूर्ण बांधून झाल्यानंतर टोल घेण्यास आमचा विरोध नाही मात्र येथे रस्ता पूर्ण होण्याअगोदरच टोल सुरू केला जात आहे. त्यामुळे कुणीही टोल देऊ नका, मागितला तर नकार द्या आणि तरीही ऐकले नाही तर संबंधितांना धडा शिकवा असे मी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.