मार्क झुकेरबर्गची आरोग्य केंद्राला भरघोस मदत

ईस्ट पालो अल्टो – फेसबुक या लोकप्रिय सोशल साईटचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग आणि त्याची पत्नी प्रिसिला चान यानी सिलीकॉन व्हॅलीतील सार्वजनिक आरोग्य केंद्राच्या विस्तारासाठी ५० लाख डॉलर्सची मदत दिली आहे. येथील रेंझवुड फॅमिली हेल्थ सेंटरसाठी २.९ कोटी डॉलर्स खर्च येणार असल्याचे समजल्यावर झुकेरबर्ग यांनी ही मदत दिली असल्याचे समजते. या हेल्थ सेंटरची नवीन इमारत पुढील वर्षात पूर्ण होणार आहे.

फेसबुकची सुरवात केल्यानंतर अल्पावधीत २९ वर्षीय मार्क जगातील अतिश्रीमंतांच्या यादीत जाऊन बसला आहे. १० वर्षांपूर्व हॉवर्ड विद्यापीठात त्याने ऑनलाईन सोशल नेटवर्कची सुरवात केली होती. त्याची संपत्ती १९ अब्ज डॉलर्स इतकी असून त्यातील कांही भाग त्याने मदत आणि देणग्या देण्यासाठी उपयोगात आणला आहे. गल्या वर्षीही त्याने व पत्नी प्रिसिला यांनी  कम्युनिटी फौंडेशनच्या मदतीसाठी फेसबुकचे ९० लाख डॉलर्स किमतीचे समभाग दिले आहेत.

Leave a Comment