मुंबई धावली.. केनियाचे वर्चस्व

मुंबई- ह्यबेटी बचाओह्ण, ह्यमतदान कराह्ण, ह्यभारत पोलिओमुक्तह्ण, ह्यग्लोबल वॉर्मिगह्ण असे संदेश घेऊन मुंबईकर रविवारी सकाळी बोच-या थंडीतही धावले. निमित्त होते मुंबई मॅरॅथॉनचे. मेट्रो सिनेमापासून सुरू झालेल्या ह्यड्रीम रनह्णला लहानांपासून ज्येष्ठ नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. सामाजिक विषयांवरील जनजागृतीकरता लावलेली ही दौड ह्ययाची देही, याची डोळाह्ण पाहण्यासाठी प्रेक्षकांनीही जागोजागी ठाण मांडले होते.

दरम्यान, या मॅरॅथॉनमध्ये सहभागी झालेल्या आजोबांनी ह्यलुंगी डान्सह्णवर धरलेला ठेका आणि लहानग्यांच्या लीलांमुळे या आनंदाला आणखीनच उधाण आले. भारतासह जगभरातील अ‍ॅथलीटचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई मॅरॅथॉमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही केनियाचे वर्चस्व राहिले. मॅरेथॉनमध्ये केनियाचा इव्हान्स रुटो प्रथम आला आहे. तर लॉरेन्स दुसरा आणि फिलोमिनने तिसरा क्रमांक पटकावला. रविवारी सकाळी मोठ्या उत्साहात या मॅरॅथॉनला सुरुवात झाली. पहाटे ५.४५ मिनिटांनी हाफ मॅरेथॉनला सुरुवात झाली. ४२ किलोमीटरची फुल मॅरेथॉन सर्वाधिक प्रतिष्ठीत समजली जाते.

हाफ मॅरेथॉनमध्ये सुधा सिंगने पहिला क्रमांक पटकावला तर कविता राऊतला दुस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पुरुष अर्धमॅरेथॉन बंगळुरुच्या इंद्रजित पटेलने जिंकली आहे. तर कोची मॅथ्यू दुस-या क्रमांकांवर आला. तर मानसिंगने तिसरा क्रमांक पटकावला. मागील दहा वर्षाचा विचार करता पुरुष गटाच्या पूर्ण आणि अर्धमॅरॅथान प्रकारात केनयाच्या धावपटूंनी वर्चस्व राखले आहे. त्यांनी तब्बल सात वेळा बाजी मारली आहे. तितक्याच वेळा जिंकत महिलांमध्ये इथियोपियाने वरचष्मा राखला आहे.

२७ वर्षीय केलायने २००७ आणि २००८ मध्ये बाजी मारली होती. पूर्ण मॅरॅथॉनच्या भारताच्या गटात १४ पुरुष आणि १८ महिला तसेच अर्ध मॅरॅथॉनमध्ये ३८ पुरुष आणि १२ महिला धावपटू धावले. यात सव्‍‌र्हिसेसने (सेनादल) वर्चस्व राखले आहे. त्यांचे तब्बल २० अ‍ॅथलीट मुंबई मॅरॅथॉनमध्ये धावले. त्यात बिनिंग लिंगखोइ, राम सिंग यादव, इलम सिंग, सी. एम. रामू, सत्यप्रकाश आणि काजिलाल पाटले आदींचा समावेश आहे.