मुख्यमंत्री चव्हाण यांच्या समोर शिक्षकांचा गोंधळ

सातारा: महाबळेश्वर येथे सुरु असलेल्या शिक्षक अधिवेशनात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना शिक्षकांच्या गोंधळ ऐकून घ्या वा लागला आहे. महाबळेश्वर येथे सुरु असलेल्या शिक्षक अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान काही शिक्षकांनी एकच गोंधळ घातला. त्याजमुळे मुख्‍यमंत्री चव्हायण यांना भाषण आटोपते घ्या.वे लागले आहे.

महाबळेश्वर येथे सुरु असलेल्या शिक्षक अधिवेशनात मुख्यमंत्री बोलायला उभे राहताच, आमच्या मागण्या मान्य करा असे म्हणत शिक्षकांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावरून त्यांना शांत राहण्यास सांगितले. मात्र त्याला प्रतिसाद न देता गुरुजींचा गोंधळ सुरुच होता. आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर दिल्लीसारखा भूकंप घडवू अशा घोषणा शिक्षकांनी दिल्या. या गोंधळामुळे मुख्यमंत्र्यांना आपलं भाषण आवरतं घ्यावे लागले. या गोंधळामुळे संयोजकाची मात्र कोंडी झाली होती.

सुरुवातीपासूनच हे अधिवेशन वादाच्या भोव-यात अडकले होते. कारण की काही शिक्षक विद्यार्थ्यांना वा-यावर सोडून अधिवेशनासाठी महाबळेश्वरला गेले होते.त्या मुळे त्यांच्याकवर एकीकडे शिक्षकांवर सर्वत्र टीका झाली. त्यानंतर आता शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान गोंधळ घातला. त्यामुळे आणखी एक नामुष्कीं ओढावली आहे.