मोदींच्या सभेवर गोवा बस संघटनेचा बहिष्कार

पणजी – गोव्यामध्ये १२ जानेवारीला होणार्‍या नरेंद्र मोदींच्या सभेवर गोव्यातील बस संघटनेने बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा बस संघटनेचे सरचिटणीस सुदिप तामणकर यांनी ही माहिती दिली.

संघटनेच्या कार्यकारणीमध्ये झालेल्या चर्चेत एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याचे तामणकर यांनी सांगितले. गोवा सरकारने गेल्यावर्षी पेट्रोलवरील वॅट रद्द केला. त्यामुळे प्रवाशांनी बसऐवजी दुचाकी वाहनांचा वापर सुरु केला. गोवा सरकारचा हा निर्णय न पटल्याने बस संघटनेने नरेंद्र मोदींच्या सभेवर बहिष्कार घालण्याच निर्णय घेतला. नरेंद्र मोदींच्या गोव्यात होणा-या सभेला दीड लाख लोक उपस्थित राहतील अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पारिकर यांनी दिली.