समस्या सोडवण्यास १० दिवस द्या – केजरीवाल

नवी दिल्ली – जनतेच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १० दिवसांची मुदत मागितली आहे. दिल्लीकरांच्या सर्व समस्या आणि तक्रारी सोडवण्यासाठी मला १० दिवस द्या, असे भावनिक आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.

यासाठी एक विशेष यंत्रणा उभारण्यात येणार आहे. तेथे प्रत्येक पत्र आणि तक्रार अर्ज स्विकारले जातील. त्यावर तातडीने निर्णय घेतला जाईल. ही यंत्रणा उभी करण्यासाठी सात ते दहा दिवसांचा कालावधी लागेल, तोपर्यंत आम्ही कोणाचेही पत्र किंवा तक्रारी स्विकारणार नाही. यासाठी दिल्लीतील जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.

नगर निगम आणि डीटीसी कार्यालयात वर्षानुवर्षे कंत्राटी काम करणारे कर्मचारी आपल्याला कायम कामगार करुन घ्यावे या मागणीसाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांना भेटण्यासाठी आले होते.