नवी दिल्ली – अंमली पदार्थाचा व्यवहार करणारे मोठे रॅकेट दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणले असून, सुमारे 100 कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत चार ठिकाणी टाकलेल्या छाप्यांतून 47 किलो हेरॉईन आणि दोन किले कोकेन जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणी एक जणाला अटक करण्यात आली आहे. अफगणिस्तानमधून हे सर्व अंमली पदार्थ आणण्यात आल्याचा संशय आहे. पंजाबमधील बटाला जिल्ह्यातील सीमेवरून हे अंमली पदार्थ भारतात येत असल्याचा संशय आहे. दिल्लीतून चेन्नईमार्गे श्रीलंका आणि पूर्वेकडील देशांत याचा व्यापार करण्यात येत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.