नरेंद्र मोदीने अमेठीतून निवडणूक लढवावी- कुमार विश्वास

नवी दिल्ली: आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणूकीची तयारी आम आदमी पार्टीने सुरू केली आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधत त्यानी नरेंद्र मोदींना किंवा पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी अमेठीतून निवडणूक लढवावी रिंगणात उतरवावे, असे आवाहन आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास यांनी दिले आहे.

याबाबत अधिक बोलताना कुमार विश्वास म्हणाले, ‘लोकसभा निवडणूक मी पण अमेठीतून लढवणार आहे. माझी कोणतीही प्रतिष्ठा नाही, मात्र मी जनतेसाठी काँग्रेस उपाध्यक्षांना आव्हान देत आहे, असेही कुमार विश्वास यांनी सांगितले. मी वंशवादाच्या राजकारणाला आव्हान देण्यासाठी अमेठीतून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांानी सांगितले.’

मी मोदींना आवाहन करतो की ते आपल्या भाषणात दहा वेळा युवराजांचे नाव घेतात. पण त्यांना खरंच घराणेशाहीचा तिरस्कार आहे तर त्यांनी राहुल यांच्याविरोधात अमेठीतून निवडणूक लढवावी असे आवाहन त्यांतनी कुमार विश्वास यांनी यावेळी केले. त्यादमुळे आगामी काळात भाजपकडून याचे उत्तर कसे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.