खासदार मिलिंद देवरा यांचा काँग्रेसला घराचा आहेर

मुंबई: आदर्श घोटाळ्याच्या अहवालाप्रकरणावरून सध्याह सर्वत्र रणकंदन माजले आहे. मुंबईतील आदर्श घोटाळ्याच्या अहवालावर विधानसभेत चर्चा होणं गरजेचे असून मीडियाच्या माध्यमातून सत्य जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे, असे देवरा म्हणाले. मिलिंद देवरा यांनी रविवारी सोशल साईटवर ही मागणी केली आहे. ही मागणी करीत काँग्रेस खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना घरचा आहेर दिला आहे.

दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने फेटाळलेल्या आदर्श प्रकरण अहवालाचा पुनर्विचार करावा, असं विधान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी करताच, राहुल ब्रिगेडनेही याच मागणीचा सूर लावला आहे. खासदार मिलींद देवरा यांची ओळख राहुल ब्रिगेडचे कार्यकर्ते महणून आहे त्यामुळे त्यांनी आदर्शसंबधी वक्तव्यय केले असल्याने सरकार अउचणीत येण्याची शकयता आहे.

गेल्याच आठवड्यात हिवाळी अधिवेशनात राज्यातील मंत्रिमंडळाने न्यायमूर्ती जे.ए.पाटील समितीने दिलेला आदर्शचा अहवाल फेटाळला होता. त्यावर काँग्रेस भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप होऊ लागला. त्यामुळे काँग्रेसनं आता नेते, अधिका-याचा बचाव बंद केला आहे. त्यायमुळे आगामी काळात मुख्य्मंत्री चव्हाधण यासंदर्भात काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.