मुझफ्फरनगर- कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हे राहुल गांधी आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या तुलनेत राहुल गांधी कितीतरी पुढे आहेत. परंतू प्रसारमाध्यमे मात्र मोदी आणि केजरीवाल यांना कृत्रिम प्रसिद्धी देत असल्याचे मत बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी रविवारी व्यक्त केले.
यावेळी पुढे बोलताना लालूप्रसाद यादव म्हाणाले, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि व केजरीवाल हे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोर काहीच नाहीत, दिल्लीतील नागरिकांनी आम आदमी पक्षाला निवडून चूक केली आहे. पुढील महिनाभरातच दिल्लीतील नागरिकांना विशेषत: झोपडपट्टीत रहाणा-यांना ही चूक निश्चित समजेल.
मदत छावण्यांमध्ये राहणा-या मुझफ्फरनगर येथील हिंसाचारातील पीडितांना भेटण्यासाठी लालू आले होते. मी तुरुंगात असताना येथील छावण्यांमध्ये काही मुले सर्दी-खोकल्यामुळे मृत्यूमुखी पडली. तेव्हाच मी येथे येण्याचे ठरवले होते, त्याामुळे आज या ठिकाणला भेट देत असल्याचे लालू यांनी यावेळी सांगितले.