लखनौ – उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून झालेले जातीय दंगे आणि त्यातून निर्माण झालेला दोन समाज घटकांतला दुरावा याचा ङ्गायदा उचलण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष आपापल्या परीने सरसावले असून त्यांच्या या प्रयत्नांमुळे जाटबहुल पश्चिम उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.
या भागातल्या मुजफ्झरनगर आणि अन्य लगतच्या दोन जिल्ह्यांमध्ये हिंदू-मुस्लीम दंगलींमुळे निर्माण झालेल्या विशिष्ट सामाजिक परिस्थितीला केवळ हिंदू-मुस्लीम नव्हे तर जाट-मुस्लीम असे स्वरूप आलेले आहे. विशेषत: जाट समाजाच्या भावना प्रक्षुब्ध झाल्या असून त्यांच्या मनात मुस्लीम समाज, कॉंग्रेस आणि राज्यातील सत्ताधारी समाजवादी पार्टी यांच्याविषयी प्रचंड चीड निर्माण झाली आहे. या वातावरणात स्पष्ट मुस्लीमविरोधी भूमिका घेतल्यामुळे भारतीय जनता पार्टीला या भागात राजकीय ङ्गायदा मिळण्याची आशा वाटत आहे.
दुसर्या बाजूला कॉंग्रेस पक्षाला मुस्लिमांची बाजू घेतल्यामुळे त्यांची मते मिळण्याची अपेक्षा वाटत आहे. त्याचबरोबर याच निमित्ताने समाजवादी पार्टी सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे सामान्य माणसे आपल्या मागे येतील अशीही शक्यता कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. जाट समाजामध्ये राष्ट्रीय लोक दलाचा मोठा प्रभाव आहे आणि या पक्षाशी कॉंग्रेसची युती झालेली आहे. त्यामुळे जाट समाजही आपल्या मागे येईल असा कॉंग्रेसचा अंदाज आहे.
दुसर्या बाजूला बहुजन समाज पार्टीचे नेतेही या वातावरणाचा ङ्गायदा आपल्यालाच मिळेल असा दावा करत आहेत. राज्यातील समाजवादी पार्टीचे सरकार असङ्गल ठरले आहे आणि असे होते तेव्हा पर्याय म्हणून राज्यातली जनता बसपाकडेच वळते असा इतिहास सांगून बसपा नेते राजकीय ङ्गायद्याचे दावे करत आहेत.
राज्यात झालेल्या दंगली भाजपा आणि कॉंग्रेसने पेटवल्या असल्याचा समाजवादी पार्टीचा आरोप आहे. या दंगलीत आपदग्रस्त झालेल्या मुस्लिमांच्या पुनर्वसनासाठी समाजवादी पार्टी प्रयत्नशील आहे. त्यामुळे आज ना उद्या मुस्लीम समाज समाजवादी पार्टीच्या मागेच येणार आहे, अशी खात्री सपाच्या नेत्यांनी दिली आहे.