नवी दिल्ली – आधार कार्ड हे अधिकृत आहे की नाही यावर बरेच संभ्रमाचे वातावरण असतानाच आयकर खात्याने पॅन कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड हा पुरावा म्हणून मानण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने काल पॅन कार्ड काढण्यासाठीच्या आवश्यक कागदपत्रांची यादी जाहीर केली आणि त्यात आधार कार्ड पत्त्याचा पुरावा म्हणून स्वीकारले जाऊ शकेल, असे नमूद केले.
आधार कार्ड हे केंद्र सरकारतर्ङ्गे दिले जात आहे आणि ती भारताच्या नागरिकांची कायमची ओळख असणार आहे. युनिक आयडेंटिङ्गिकेशन ऑथॅरिटी ऑङ्ग इंडिया तर्ङ्गे हे आधार कार्ड दिले जात आहे. आजपर्यंत या संस्थेने ५१ कोटी लोकांना आधार कार्डे दिली आहेत आणि दररोज ११ लाख लोकांना नवी कार्डे दिली जात आहेत. त्याचा नेमका उपयोग काय आणि ते अनिवार्य आहे का, यावर बरीच चर्चा होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालात कोणत्याही सरकारी अनुदानासाठी आधार कार्ड आवश्यक नाही, असा निर्वाळा दिला. ते अनिवार्य नसले तरी पत्त्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येऊ शकेल, असे आयकर खात्याने आता म्हटले आहे. पॅन कार्ड मिळविण्यासाठी मतदान ओळखपत्र, छायाचित्रासहित असलेले रेशनकार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना, शस्त्र परवाना हीही कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार आहेत.