महिलांसाठी मायक्रोसॉफ्टचे गार्डियन अ‍ॅप्स

हैदराबाद – महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटना लक्षात घेऊन मायक्रोसॉफ्ट इंडियाने भारतातील महिलांच्या सुरक्षेसाठी खास ह्यगार्डियन अ‍ॅप्सह्ण हे अ‍ॅप्लिकेशन तयार केले आहे. संकटात असताना नातेवाइक आणि पोलिस, रुग्णालयांशी ताबडतोब संपर्क साधणे यामुळे शक्य होणार आहे. दिल्लीमधील ह्यनिर्भयाह्ण प्रकरणानंतर कंपनीच्या तज्ज्ञांनी तब्बल सहा महिने मेहनत घेऊन तयार केलेले ह्यगार्डियनह्ण हे अ‍ॅप्लिकेशन गुरुवारी दाखल केले.

भारतातील विंडो फोन वापरणा-यांना ते उपलब्ध होणार असल्याचे मायक्रोसॉफ्ट आयटी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राज बियाणी यांनी सांगितले. मायक्रोसॉफ्ट विंडो ह्यअझ्युर क्लाउड सर्व्हिसह्ण आणि ह्यबिंग मॅप एपीआयह्ण या तंत्रज्ञानाचा यात वापर केला आहे. यात ह्यट्रॅक मीह्णच्या माध्यमातून मित्र आणि कुटुंबीयांशी संपर्कात राहता येणार असून, ह्यएसओएसह्ण अलर्ट बटन दाबताच या स्थळासह धोक्याची सूचना त्यांना देता येणार आहे. तसेच सुरक्षा संस्था, पोलिस आणि रुग्णालयांना ताबडतोब सूचित करता येईल.

फोनची मोडतोड झाली, तरीही तो हेरता येणार असून यातील ह्यवनटच व्हीडिओ रेकॉर्डिंगह्णमुळे ठोस पुरावाही उपलब्ध होऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. गेल्या सहा महिन्यापासून हे अ‍ॅप्लिकेशन बनविले जात होते. आमच्या येथील कर्मचा-यांना सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असे अ‍ॅप्लिकेशन बनवायचे होते. यामुळेच त्यांनी गार्डियन हे अ‍ॅप बनविले. हे अ‍ॅप स्मार्टफोनमधील इतर अ‍ॅप्लिकेशपेक्षा सुधारित आणि सुरक्षित आहे. असे बियानी यांनी सांगितले. गार्डियन हे अ‍ॅप्लिकेशन वापरण्यासाठी यूझर्सनी मित्रांचे आणि कुटुंबातील व्यक्तींचे फोन नंबरचा सामावेश यात केला पाहिजे. यूजर्सना फक्त यातील एसओएस बटन दाबल्यास तात्काळ आपला मेसेज आणि आपण कोठे आहोत याची माहिती आपल्या मित्रांना आणि कुटुंबातील व्यक्तींना मिळेल. या मेसेजसोबतच ईमेलही पाठवला जाईल, असे बियानी यांनी सांगितले.