मुंबई – अनिवासी भारतीयांना नियमाप्रमाणे १ किलो सोने भारतात आणता येते याचा फायदा सोने व्यापारी घेत असल्याचे दिसून आले आहे. चलनवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने सोने आयातीवरील बंधने कडक केली असून आयात शुल्कही १० टक्कयांवर नेले आहे. शिवाय आयातीपैकी २० टक्के दागिने स्वरूपात निर्यात करण्याचे बंधनही घातले गेले आहे. परिणामी सोने आयात एकदमच घटली असून ऐन लग्नसराईच्या दिवसांत बाजारात सोन्याची चणचण निर्माण होत आहे. यावर वरील उपाय सोने व्यापार्यानी योजला आहे.
सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ परदेशी वास्तव्य असणार्या अनिवासी भारतीयांना आयात कर भरून १ किलो सोने भारतात आणता येते. त्यात त्यांच्यावर निर्यातीचे बंधन नसते. त्यामुळे अनेक व्यापार्यानी अशा एनआरआयचे सहाय्य घेतले असल्याचे दिसून आले आहे. व्यापारी त्यासाठी संबंधितांना विमान भाडे देत आहेत. या पद्धतीने या महिन्यात दुबईहून कालिकत विमानतळावर ८० किलो सोने आणले गेल्याचे विमानतळ अधिकार्यानी सांगितले. अर्थात अशा प्रकारे सोने आणणे हे कायदेशीर असल्याने ते अडविता येत नाही असेही त्यांचे म्हणषे आहे.
याचा फायदा घेऊन ट्रॅव्हल एजंट एनआरएआयसाठी २०-३० तिकीटे दररोज बुक करत आहेत. हे अनिवासी भारतीय सोने आणतात, त्याची रितसर डयूटी भरतात. हे प्रमाण तमीळनाडू आणि केरळात सर्वाधिक आहे. यात प्रामुख्याने केरळ आणि तमीळनाडूतील लेबररचा भरणा आहे. नोव्हेंबरमध्ये भारतात सोन्याची अधिकृत आयात २१ टनच झाली असून हे प्रमाण दरवेळच्या प्रमाणाच्या निम्मेच असल्याचे समजते.