नवी दिल्ली – आम आदमी पक्षात बुधवारी सरकार स्थापन होण्यापूर्वीच बंडखोरी उफाळून आल्याचे वृत्त होते. त्यापमुळचे मंत्रिमंडळाच्या संभाव्य यादीत नाव नसल्याने बंडखोरीचा पवित्रा घेत विनोदकुमार बिन्नी या आमदाराने ‘आप’ची पोल खोलण्याचा इशारा दिला होता. मात्र पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी बिन्नींच्या नाराजीच्या बातमीचे खंडन करत पक्षात कोणतीही फूट पडली नसल्याचे स्पष्ट केले आहे. बिन्नी यांची नाराजी दूर करण्यास आपला यश आले आहे.
केजरीवाल हे बुधवारी सकाळी आयोजीत करण्यात आलेल्यास जनता दरबारात बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जनतेला दिलेले ७०० लीटर पाण्याचे वचन ‘आप’चे सरकार स्थापन झाल्यावर २४ तासांत पूर्ण केले जाईल, असे आश्वासन केजरीवाल यांनी दिले.
आगामी काळात होत असलेल्यां ‘आप’ सरकारच्या शपथविधीची तारीख अद्याप निश्चिबत झाली नसल्याचेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले. दरम्याेन, बुधवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना बिन्नी म्हणाले, माझ्या आणि पक्षाच्या मतांमध्ये कोणताही दूदुराव नसून, मंत्रिमंडळाच्या निर्णयावरून कोणत्याही प्रकारची नाराजी मी व्यक्त केली नसल्याीचे त्यांनी प्रसारमध्य्मापुढे बोलताना स्पष्ट केले.