पुणे – जपानी मोटरसायकल कंपनी कावासाकीने त्यांची नवी दोन मॉडेल्स जेड १००० व निजा १००० भारतात विक्रीसाठी उपलब्ध केली असून दिल्ली व पुणे येथील शोरूममध्ये या गाड्यांची विक्री केली जाणार आहे. या गाड्यांची किंमत प्रत्येकी १२ लाख रूपये आहे आणि या गाड्या आयात करून येथे विकल्या जाणार आहेत.
इंडिया कावासाकीचे उपाध्यक्ष निस्कोकावा शिजेतो या संदर्भात माहिती देताना म्हणाले की या दोन मोटरबाईकमुळे भारतीय बाजारात आता त्यांची चार मॉडेल्स विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत. या दोन्ही बाईकना १०४३ सीसीचे इंजिन असून या गाड्याची विक्री वाढविण्याचे जोरदार प्रयत्न केले जात आहेत. याचबरोबर कंपनी एन्डेव्हर आणि क्रूझर मोटरसायकलीची भारतात विक्री करण्यासंबंधी विचार करत आहे.