हैद्राबाद – शीतपेये आणि स्नॅक्स बनविणार्या पेप्सिकोने हैद्राबादच्या श्रीसिटीमध्ये १२०० कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असून येथे देशातील सर्वात मोठा ब्रेवरीज प्रकल्प उभारला जात असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीने कांही दिवसांपूर्वीच भारतात अन्य भातीदारांच्या सहाय्याने २०२० पर्यंत ३३ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येंणार असल्याचे जाहीर केले आहे. या प्रकल्प या घोषणेचाच एक भाग असल्याचे समजते.
पेप्सिको इंडियाचे अध्यक्ष व सीईओ डी. शिवकुमार म्हणाले की श्रीसिटी ही जागा आमच्या प्रकल्पासाठी अतिशय योग्य आहे. येथे पुरेसे मनुष्यबळ, कनेक्टिव्हीटी आहे. या ब्रेवरीजमध्ये फ्रूट ज्यूसवर आधारीत शीतपेये, कार्बोनेटेन सॉफ्ट ड्रिंक्स, स्पोर्टस ड्रिंक्स तयार केली जाणार आहेत. आगामी सहा वर्षात कंपनी आंध्रातील मँगो पल्प खरेदीही वाढविणार आहे. हा प्रकल्प तीन टप्यात पूरा केला जाणार आहे व यामुळे ८ हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.