‘करले प्यार करले’ चे म्युझीक लाँच

श्रीकृष्ण इंटरनॅशनलद्वारा प्रस्तुत ‘करले प्यार करले’ या चित्रपटटालचे म्युझीक लोंच नुकतेच पुण्यात करण्यात आले. यावेळी अभिनेता शिव दर्शन, निर्माते सुनिल दर्शन, दिग्दर्शक राजेश पांडे, राहुल भंडारी, भाऊसाहेब भोईर, रूनी खान आणि अभिनेत्री हासलिन कौर, सुभाष सणस आदी उपस्थित होते. हा चित्रपट कबीर आणि प्रीत यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे.

अतिशय निराशाजनक परिस्थितीत 8 वर्षीय कबीर प्रीतच्या प्रेमात पडतो तेव्हाच कबीर च्या हातून एक गुन्हा घडतो ज्यामुळे त्याला बालसुधारगृहात जाण्याची वेळ येते या बिकट परिस्थितीतुन कबीरला बाहेर काढण्यासाठी त्याची आई गाव सोडण्याचा निर्णय घेते. 12 वर्षे भटकल्या नंतर ते परत पहिल्याच गावात परत जातात तिथे कबीर आणि प्रीत हे दोघे पुन्हा एकत्र येतात. या चित्रपटातुन शिव दर्शनच्या रूपाने बॉलिवुडमध्ये आणखी एक दिग्दर्शक पुत्र पदार्पण करत आहे. चित्रपटाला रेयान अमीन,रशीद खान, प्रशांत सिंग, सुनील दर्शन, मंम्झी, मीत ब्रोस, अंजान यांचे संगीत आहे.