देवयानी खोब्रागडे यांना तात्पुरती राजनैतिक सुरक्षा

वॉशिंग्टन – देवयानी खोब्रागडे यांना संपूर्ण राजनैतिक सुरक्षा देण्यासाठी त्यांची संयुक्त राष्ट्रामधील कायमस्वरुपी कार्यालयात बदली केली असली तरी, त्यांना तात्पुरती राजनैतिक सुरक्षा मिळेल असे भारताकडून स्पीष्ट, करण्यारत आले आहे. अमेरिकेत त्यांना अटक होणार नाही. मात्र त्यांच्या विरोधातील व्हीसा घोटाळयाचा खटला सुरु राहील असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
देवयानी खोब्रागडेला राजनैतिक सुरक्षा कवच मिळाले म्हणून आधी तुमच्या विरोधात दाखल झालेले गुन्हे रद्द होणार नाहीत. ते कायम राहतील. कुठल्याही राजनैतिक अधिका-याची कायमस्वरुपी खटल्यातून सुटका होऊ शकत नाही. राजनैतिक सुरक्षा तुमच्या दर्जावर अवलंबून आहे असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या महिला प्रवक्त्या जेन पसाकी यांनी सांगितले.

दरम्याेन, देवयानी खोब्रागडे प्रकरणात अमेरिकेने खंत व्यक्त केली असली तरी, माफी मागण्यास नकार दिला आहे. दरम्यान अमेरिकेत देवयानी खोब्रागडे यांच्या घरी काम करणा-या संगीता रिचर्ड हिच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली.