बांगलादेशमध्ये आठ जणांना फाशी

ढाका- बांगलादेशमधील विरोधी पक्षांनी मागील वर्षी (२०१२) पुकारलेल्या बंदच्या दरम्यान एका टेलरचा खून केल्याप्रकरणी येथील जलदगती न्यायालयाने आवामी लीगच्या आठ कार्यकर्त्यांना फाशी, तर इतर तेरा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बांगलादेशमधील चार न्यायाधीशांच्या खंडपीठाने आरोपींना ही शिक्षा ठोठावली. बांगलादेश छात्र लीगच्या (बीसीएल) कायकर्त्यांनी गेल्या वर्षी नऊ डिसेंबरला बिस्वाजित दास या 24 वर्षीय टेलरचा खून केला होता. “बीसीएल’ अवामी लीगची विद्यार्थी संघटना आहे.