मुंबई – बॉलीवूडच्या अनेक सिनेमांना ऑस्करमध्ये नामांकन मिळालेली आहेत. पण यंदा बॉलवूडची हॉट मॉडेल आणि बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्राच्याआ ‘कामसूत्र थ्रीडी`ला ऑस्करच्या शर्यतीत स्थान मिळाले आहे. ऑस्कर पुरस्कारासाठी, तीन विभागांत सिनेमाला नामांकने मिळाली आहेत. ‘कामसूत्र थ्रीडी` ला ऑस्करच्या शर्यतीत नामाकंन मिळाल्यामने शर्लिन चोप्रा सध्या खूष आहे.
‘कामसूत्र थ्रीडी` या सिनेमाला बेस्ट मोशन पिक्चर, ओरिजनल स्कोर आणि ओरिजनल साँग या विभागांत ही नामांकने देण्यानत आली आहेत. या सिनेमातील ‘हर हर महादेव`, ‘अय्यगिरी नंदिनी`, ‘सावरिया`, ‘आय फेल्ट` आणि ‘ऑफ सोईल` या पाचही गाण्यांना बेस्ट ओरिजनल साँग विभागात नामांकने मिळाली आहेत. ही गाणी रूपेश पॉल आणि प्रत्युष प्रकाश यांनी लिहिली आहेत. तर या गाण्यांना चेन्नईतील सचिन आणि श्रीजीत यांनी संगीत दिले आहे.
रूपेश पॉल यांनी ‘कामसूत्र थ्रीडी`चं दिग्दर्शन यांनी केले आहे. विशेष म्हणजे या सिनेमात आपले मराठमोळे अभिनेते मिलिंद गुणाजी आणि मकरंद देशपांडे यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या विभागात २८९ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. ओरिजनल साँग विभागात ७५ गाण्यांचा समावेश आहे. ओरिजनल स्कोर विभागात ११४ गाण्यांमध्ये स्पर्धा होईल. ऑस्कर पुरस्कारासाठी जाहीर झालेली नामांकनं प्राथमिक फेरीतील आहेत. पुढील वर्षी १६ जानेवारी रोजी ऑस्कर पुरस्कारासाठीच्या अंतिम नामांकनांची घोषणा होणार आहे. ऑस्कर पुरस्काराचा अंतिम सोहळा २ मार्च रोजी होईल.