हॉवर्ड विद्यापीठात बॉम्बची अफवा- परिक्षा रद्द

अमेरिकेतील सुप्रसिद्ध आणि अतिशय नावाजलेल्या हॉवर्ड विद्यापीठात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेने कांही काळ एकच गोंधळ माजला.ज्या चार इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा मेसेज मिळाला होत्या त्या चारी इमारती ताबडतोब रिकाम्या करण्यात आल्या. सुरक्षा रक्षक व पोलिसांनी तत्काळ संबंधित इमारतींचा कसून शोध घेतल्यानंतर ही अफवाच असल्याचे उघड झाले. मात्र तोपर्यंत येथे होणार असलेल्या परिक्षा रद्द करण्यात आल्या.

विद्यापीठाच्या वेबसाईटवर त्यानंतर संदेश प्रसारित करून संबंधित इमारतींत कोणताही धोका नसल्याचे सांगितले गेले. विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी विद्यापीठातर्फे घेतली जाते यामुळेच संबंधित इमारतीत स्फोटके असल्याचा संदेश येताच त्या पूर्ण रिकाम्या केल्या गेल्या व विद्यार्थी शिक्षकांना तसेच कर्मचार्‍यांना ईमेल व एसएमएस करून सावधानतेचा इशारा दिला गेला असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.