मुंबईत विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्या 2765 वाहनचालकांकडून दंड वसूल


मुंबई : मुंबई वाहतूक पोलिसांनी बुधवारी आयोजित केलेल्या ‘नो हाँकिंग’ मोहिमेच्या पहिल्याच दिवशी 2700 वाहनचालकांवर कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या आदेशावरून वाहतूक पोलिसांनी विनाकारण हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या 2 हजार 764 वाहनचालकांवर कारवाई केली आहे. मोहिमेदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करून 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र, नवीन नियम लागू झाल्यानंतर ते 1,000 रुपयांपर्यंत वसूल केले जाऊ शकते.

वाहतूक पोलिसांनी 9 जूनपासून चालक आणि त्यावर बसलेल्या इतर व्यक्तींना हेल्मेट घालणे बंधनकारक केले आहे. नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तथापि, डीसीपी राज टिळक रोशन म्हणाले की, वाहतूक पोलिस यासंदर्भात लोकांना हेल्मेटच्या नियमांची माहिती देत ​आहेत. हेल्मेट न घालता वाहन चालवू नका, असे आवाहन केले जात आहे.