गौहर-कुशालचे नाते किती दिवस टिकणार

बिग बॉस’ मधील कुशाल टंडन आणि गौहर खान दोघंही एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले आहेत. बिग बॉस’मधील गौहर- कुशलच्या प्रेमावर शिक्कामोर्तब झाला असल्याीचे नुकत्या च या शोमधून बाहेर पडलेल्या काम्या पंजाबीने म्हटले आहे. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेत, दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात पण हे सांगण कठिण आहे, की हे नातं किती दिवसांपर्यंत टिकू शकेल, हे आताच सांगता येणार नाही, असे काम्याने स्पकष्टय केले आहे.

आगामी काळात जर गौहर आणि कुशालने लग्न करण्या्चे ठरविले तर त्याटमध्ये लग्नात सहभागी होण्याची इच्छाही बोलून दाखविली. एका वेबसाईटला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये बोलताना काम्याा म्हणाली, बिग बॉसच्या घरातील प्रेमाची परंपरा खूप जुनी आहे. पण, खूप कमी नाते येथून बाहेर पडल्यानंतरही टिकू शकले. याच परंपरेवर सध्या गौहर आणि कुशाल चालत आहेत.

याअगोदरच्या सीझनमध्ये बीग बॉसच्या घरात सारा खान – अली मर्चंट, अश्मित पटेल – वीणा मलिक यांचं एकमेकांवर ऊतू गेलेलं प्रेमही लोकांनी पाहिलं होतं. परंतु, त्यांचं नातं काही जास्त काळ तग धरू शकलं नही. आता कुशाल आणि गौहर यांचं नातं या घरातून बाहेर पडल्यानंतरही टिकून राहतं किंवा नाही, हे आगामी काही दिवसातच समजून येईल.