मुलगी बॉलिवूडमध्ये आल्यास आनंदच- अमिर खान

आगामी काळात माझ्याप्रमाणे मुलगी इराने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केल्यास, आपल्याला आनंद होईल, असे मत बॉलवूडचा अभिनेता आमिर खान यांनी व्य्क्तद केले. मात्र, हे करीत असताना मुलांवर कोणताही निर्णय थोपवणार नसल्याचेही अमिर खान यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

आमिरची पहिली पत्नी रीनाला मुलगी इरा आणि मुलगा जुनैद अशी दोन मुले आहेत. दुसरी पत्नी किरण रावला एक मुलगा आहे. त्याचे नाव आझाद आहे. तसे पहिले तर बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान त्यााच्यान मुलांच्या बाबतीत खूपच लवचिक आहे.

तुझ्या मुलीने सिने जगतात पाय टाकल्यास, तुला आनंद होईल का, असं आमिरला विचारण्यात आले. यावर अमिर म्हणाला, “ मला आनंद होईल, पण मला तसं वाटत नाही. मी तिला विचारत नाही.ज्यायला जे करायचंय तेच त्याने करावे. माझा किंवा आमच्या कोणाचाच त्याच्यावर दबाव नाही. जर ते सिनेजगतात येऊ इच्छित असतील, तर माझ्या सर्व मुलांच्या निर्णयावर खुश असेन.