अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझानच्या वैवाहिक आयुष्याचा नुकताच काडीमोड झाला आहे. हृतिक आणि सुझानचे गेल्या १७ वर्षांपासूनचे वैवाहिक संबंध संपुष्टात आले आहेत. सुझानवर माझे पूर्वीपासून खूप प्रेम आहे आणि ते आयुष्यभर माझं प्रेम राहिल, असे अभिनेता हृतिक रोशनने म्हटले आहे. घटस्फोटामुळे हृतिक फारच दु:खी झाल्याचे दिसून येत आहे.
याबाबत फेसबुक पेजवर आपल्या भावना व्यक्त करताना हृतिक म्हचणाला सुझानने दिलेला घटस्स्फोफट म्ह्णजे ही माझी प्रेमाला सर्वात मोठी श्रद्धांजली आहे. सुझानवर माझे पूर्वीपासून खूप प्रेम आहे आणि ते आयुष्यभर माझे प्रेम राहिल. जर माझ्याशिवाय तिच्या चेह-यावर हसू फुलत असेल, तर तिच्यासाठी मी अलिप्त होईन सुजाननं स्वत:च वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आमचे मागील १७ वर्षांपासूनचे संबंध संपुष्टात आले आहेत. माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी हा काळ अतिशय कठीण आहे.
कहो ना प्यार है या सिनेमानंतर, हृतिक – सुझानचा २० डिसेंबर २००० रोजी विवाह झाला होता. त्यांना रेहान (७) आणि रिधान (५) अशी दोन मुले आहेत.ह्रतिकनं एका निवेदनातून आपल्या घटस्फोटाविषयी स्वत:हून माहिती दिली आहे.