अभिनेत्री काम्या पंजाबी बिग बॉस सीझन-७ मधून शनिवारी बाहेर पडली आहे. काम्याने बिग बॉसच्या घरात तब्बल १३ आठवडे व्यतीत केले आहेत. या कालावधीत आपण कोणत्याही प्रकारच्या राजनीतिचा भाग नव्हते, त्यामुळेच मी आनंद आहे, असे काम्याने बिग बॉस सीझनमधून शनिवारी बाहेर पडल्या नंतर म्हतटले आहे. नुकत्याच झालेल्या आपल्या घटस्फोटाच्या कारणावरून काम्या अनेकदा गंभीर दिसली होती. पण, घरातल्या सगळ्या स्पर्धकांसाठी चविष्ठ जेवण बनवणं काम्याचं आवडतं काम होते.
छोट्या पडद्यावर नकारात्मक भूमिका निभावणारी ३४ वर्षीय काम्या ही यंदाच्या बिग बॉसच्या सीझनमधली दमदार स्पर्धक मानली जात होती. नव्हे, विजेत्यांमध्येही तिच्या नावाची शक्यता मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जात होती. घरातून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यामांशी बोलताना काम्या म्ह णाली ‘मला घरातून बाहेर पडल्याचं अजिबात आश्चर्य वाटलं नाही. जेव्हा मला नॉमिनेट केले गेलं तेव्हाच मी या कार्यक्रमातून बाहेर पडण्यासाठी तयार झाले होते. गेल्या अनेक आठवड्यांपासून मला घरी जाण्याची ओढ लागली होती’ असेही काम्याने म्हटले आहे.
‘बिग बॉक्स’ या अनोख्या टास्कमध्ये काम्यानं एका छोट्याशा बॉक्सखाली ४० तासांपेक्षाही जास्त वेळ बंद राहून एक अनोका रेकॉर्ड केला होता. तिची या शो दरम्यान टिकून राहण्याची जिद्दही यानिमित्तानं दिसली होती. काम्यानं घरातील प्रत्येक स्पर्धकाबरोबर एक नाते तयार केले होते. आता, बिग बॉसच्या घरात गौहर खान, कुशाल टंडन, तनिषा मुखर्जी, अरमान कोहली, संग्राम सिंग, व्ही जे अँन्डी आणि एजाझ खान हे स्पर्धक उरले आहेत.