कोलकाता: टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भाजपची लोकसभेची ऑफर नाकारली आहे. सौरव गांगुलीने लोकसभा निवडणूक लढवावी अशी ऑफर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनीच गांगुलीला ही दिल्याची चर्चा होती. तसेच आगामी काळात जर भाजपची सत्ता आली तर गांगुलीला क्रीडामंत्री करू असंही सांगण्यात आले होते. मात्र गांगूलीने ही ऑफर नाकारली आहे.
ऑफर फेटाळल्यांनंतर बोलताना सौरव गांगुली म्ह्णाला, माझी जागा लोकसभा सभागृहात नाही, तर माझे काम मैदानातील आहे. गांगुलीला लोकसभा नाही तर राज्यसभेवर जाण्याची इच्छा आहे का, याबाबतही विचारणा केली असता, त्याने तूर्तास नकार दिला आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपाची स्थिती मजबूत करण्यासाठी भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गांगुलीला लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. गांगुलीने या ऑफरला दुजोराही दिल्याने गांगुली ही ऑफर स्विकारतो का? याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. मात्र, निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याचे सांगत गागुंलीनं ही ऑफर फेटाळली आहे.