दिल्लीवरील हल्ल्याचा कट उधळला; एकाला अटक

नवी दिल्ली – दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानमध्ये ’लष्करे तैयबा’ या दहशतवादी संघटनेचे जाळे पसरवून, दिल्लीत हल्ला करण्याचा कट आज (शुक्रवार) सकाळी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळवून लावला. या प्रकरणी मेवात येथील इमामाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या इमामाचे नाव मोहम्मद शाहिद असे आहे. शाहिदने दोनवेळा पाकिस्तानला भेट दिली आहे. त्याच्या डायरीमध्ये दिल्लीमधील हल्ल्‌याच्या योजनेचे पुरावे सापडले आहेत. शाहिदचा सहकारी पळून जाण्यात यशस्वी ठरला असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल. लष्करे तैयबाचा कमांडर जावेद बालुची हा यांचा मार्गदर्शक असल्याचे समोर येत आहे. बलुची आणि शाहिद यांच्यातील चर्चा टॅप केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.