
नवी दिल्ली – मुंबईच्या समुद्रकिनार्यावर १४ ऑगस्ट रोजी बुडालेल्या आयएनएस सिंधुरक्षक या पाणबुडीला झालेल्या अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही, अशी कबुली संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी राज्यसभेत दिली.

नवी दिल्ली – मुंबईच्या समुद्रकिनार्यावर १४ ऑगस्ट रोजी बुडालेल्या आयएनएस सिंधुरक्षक या पाणबुडीला झालेल्या अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही, अशी कबुली संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी राज्यसभेत दिली.
तांत्रिक बिघाडामुळे पाणबुडीचा संपर्क तुटला होता. यामुळे त्यात झालेले स्फोट आणि आगीचे कारण समजू शकले नाही. पाण्याच्या आत मंदावलेली दृश्यक्षमता हेदेखील अपघाताचे एक कारण ठरले, असेही अँटनी म्हणाले. काही खासदारांनी सिंधुरक्षक पाणबुडीला झालेल्या अपघाताचा अहवाल मांडण्याची मागणी केली होती. सिंधुरक्षकला झालेल्या अपघातात अठरा नौसैनिकांचा बळी गेला होता.
राजस्थानमधील गुर्जर समाजाला आरक्षण देण्याचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे सरकारने आज संसदेत स्पष्ट केले. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. गुर्जर समाजाला इतर मागास वर्गाच्या मिळत असलेल्या सवलती कायम असून केंद्राच्या यादीत त्याचा उल्लेख असल्याचेही सामी यांनी नमूद केले.
गुर्जर समाज राजस्थानमध्ये पाच टक्के आरक्षणाची मागणी करीत आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील दौंडिया खेडा गावच्या किल्ल्यातील रहस्यमय खजिना शोधण्यासाठी झालेल्या उत्खननाचा खर्च सुमारे पावणेतीन लाख रुपये असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री चंद्रेश कुमार कटोच यांनी दिली. राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली.
राजा राव रामबक्षसिंह यांच्या किल्ल्यात खजिना असल्याचे एका साधूला स्वप्नात दिसल्यानंतर भारतीय पुरातत्त्व खात्याने तेथे उत्खनन करण्यास सुरवात केली होती. परंतु, तेथे पुरातन काळातील भांडी, दागिने आदी मिळाल्याचे कटौच यांनी स्पष्ट केले.