मुंबई : ‘बिग बॉस’ रिअॅलिटी शो मधील वाद आता बाहेर आला सोफिया हयात हिने घरातून बाहेर पडल्यानतर अरमान कोहली यांच्या विरूद्ध पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ‘बिग बॉस’ मधील स्पर्धक अरमान कोहली याने मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप सोफियाने या तक्रारीत केला आहे. सोफिया आणि तिच्या वकिलांनी सांताक्रुझ पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल केला आहे.
दोन दिवसांपूर्वीच सोफिया बिग बॉसमधून बाहेर पडली आहे. सोफियाच्या तक्रारीनुसार सांताक्रुझ पोलिसांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण लोणावळ्यातील बिग बॉसच्या घरात झाल्यामुळे लोणावळा पोलिसांकडे हस्तांतरीत केले आहे. चार डिसेंबर रोजी बिग बॉसच्या घरात अरमान कोहलीने सोफियाला मारहाण आणि शिवीगाळ केली, अशी सोफियाची तक्रार आहे.
पोलिस ठाण्यात अरमान कोहली विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अरमान कोहलीने एका महिलेला मारहाण केली आहे. त्यामुळे त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे, असे सोफिया हयात हिचे मत आहे. सोफिया हयात ही ब्रिटीश नागरिक असल्यामुळे तिने ब्रिटीश वकिलातीमध्येही अरमान कोहलीच्या विरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. अरमान कोहलीविरूद्ध कोर्टात मानहानीचा दावाही दाखल करणार आहे. हे प्रकरण आता कोर्टात गेल्यानने चांगलेच रंगले आहे. त्याामुळे आता आगामी काळात रिअॅलिटी शो बनवणा-या प्रॉडक्शन हाऊस किंवा चॅनेल्ससाठी काही निर्देश जारी होतील का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.