एस्सेल स्टुडिओची शाहरूखकडून खरेदी

एस्सेल स्टुडिओ बॉलीवूड बादशहा शाहरूख खान याने खरेदी केल्याचे वृत्त असून या स्टुडिओच्या खरेदीसाठी अन्य दोन तीन खरेदीदारांनीही बोली लावली होती. इंडस्ट्रीतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्टुडिओ मालकांनी शाहरूख बरोबरचे डील फायनल केले असून येत्या सहा महिन्यात हा व्यवहार पूर्ण होईल.

अन्य सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खरेदी व्यवहार पूर्ण झाला आहे आणि स्टुडिओ मालक लवकरच या कराराची घोषणा करणार आहेत. शाहरूख या स्टुडिओचे नूतनीकरण करणार आहे व कदाचित त्याचे नांवही बदलले जाईल असेही सांगितले जात आहे. शाहरूखला बांद्रा येथील मेहबूब स्टुडिओ खरेदी करावयाचा होता मात्र त्याची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नव्हती. मेहबूब स्टुडिओ शाहरूखच्या मन्नत या घराजवळच आहे. एक फिल्म प्रॉडक्शन कंपनी, आयपीएल ची टीम, एक व्हीएफएक्स स्टुडिओ शाहरूखने यापूर्वीच खरेदी केले आहेत. शाहरूखचा  व्यापार वाढविण्याचा विचार असल्याचेही सांगितले जात आहे.